वनरक्षका वरील कारवाई ही चुकीची, कारवाई मागे घ्यावी!’ परिसरातील नागरिकांची निवेदनात मागणी

0
1078

  • यश कायरकर.,
    तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिटातील वनरक्षक पी.एम.गायकवाड यांच्या राहते नाक्‍यावर आलेवही येथे 21 ऑक्टोबरला धाड टाकून नाक्याच्या भिंतीलगत व बाजूला सुरक्षा भिंतीला लागून ठेवलेले व नाक्याजवळील मोकळ्या जागेत गोळा करून ठेवलेले सागवानाचे लाकडे 2.220 घनमीटर अंदाजे 1.50 लक्ष रुपयाची किंमत असलेले लाकडे हस्तगत करण्यात आली. मात्र या गोळा करून ठेवलेल्या सागवानाची नोंद त्यांच्याजवळ उपलब्ध नसल्याने गायकवाड वनरक्षक यांच्यावर वन गुन्हा अनुसार कारवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. नागभीड व येथील कोर्टात त्यांच्यावर खटला दाखल करन्यात आला. व गुप्त सूचनेच्या आधारे त्यांच्या परिचित लोकांच्या घरी सुद्धा तपासणी करण्यात आल्या मात्र त्यात कुठलाही वन ऐवज जप्ती अधिकाऱ्याला हस्तगत करता आला नाही. ही कारवाई गुप्त सूचनेनुसार अतिरिक्त कार्यभार असलेले वन विभागाचे प्रभारी वन अधिकारी श्री शतीष चोपडे यांनी केली.
    मात्र सदर घटनेची स्थानिक पत्रकारांना कुठलीही प्रेसनोट देण्यात आली नाही मात्र एका प्रसिद्ध दैनिकाचे पत्रकार यांनी एकशे पन्नास किलोमीटर अंतरावरून त्यांच्या सदर दैनिकात या कारवाही संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी वाचल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी, शेतकरी व स्थानिक पत्रकारांनी वास्तविकता व प्रकाशित झालेली बातमी यात 99% चुकीचे लिहून वनरक्षक गायकवाड यांना त्या वर्तमानपत्राने व त्या पत्रकारांने बदनाम केल्याचे व संबंधित गायकवाड वन रक्षकाने न केलेल्या गुन्ह्यात कुणाच्या तरी राजकीय दबावामुळे जाणुनबुजून गुंतवले जात आहे. असे परिसरातील व गावकरी आणि शेतकरी यांनी बोलणे सुरू केले. व या घटनेविरोधात व केलेले कारवाई बद्दल पुनर्विचार करून वनरक्षक गायकवाड यांना पुन्हा आमच्याच आलेवाही बिटात पूर्ववत नियुक्त करावे. अशी मागणीचे हे निवेदन मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे 27 आक्टों. ला देण्यात आले असल्याचे लोकांनी सांगितले.
    आलेवाही बीटा मध्ये 4-5 वर्षे पुर्वी वनरक्षक पी.एम. गायकवाड हे जेव्हापासून बदलून आले तेव्हापासून त्यांनी आज पर्यंत कोणतेही चोरीचे कार्य या बिटात केलेले नाही. उलट परिसरातील लाकूड चोरी, सागवान चोरी, अतिक्रमण आणि अवैध शिकार यावर त्यांनी आळा घातला आहे. त्यांनी काही लोकांचे जंगलातून चोरून नेतांना सागवानाची लाकडे व काही वाहने जप्त करून वनविभागाच्या वनपरिक्षेत्र तळोधी येथे जमा केली. व त्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे गायकवाड या बिटात असेपर्यंत सागवान चोरीचा धंदा चालणार नाही या भीतीपोटीच कोणीतरी चोरट्यांनी त्याच्याविरोधात खोटी माहिती पुरवून कारवाई करायला लावली, या कारवाईमुळे आत्ता  चोरांना रान मोकळे झाले’ असे लोकांचे म्हणणे आहे.
    “नेहमीच आपल्या कार्यात दक्ष व जंगलात पूर्ण वेळ देणारे , मानव-वन्यजीव संघर्ष करिता अत्यंत संवेदनशील असलेल्या व सतत वाघ, बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राणी सप्ताहाला 1-2 याप्रमाणे मारले जात असतानाही सर्व परिसरातील लोकांची शेतकऱ्यांशी समन्वय साधून परिसर शांत ठेवणार्या वनरक्षकानी त्यांच्या नाक्याच्या परिसरात मिळालेली व जप्ती केलेली लाकडे विकण्यासाठी नव्हे तर विभागात जमा करण्याकरताच गोळा केलेली होती. मात्र सतत चे जंगली डुक्कर,हरीन, रानगवे यांच्या मुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसानीची पंचनामे, गावातील बिबट्या चे धुमाकूळ त्यामुळे गावात रात्री च्या गस्ती, पाळीव प्राण्यांची वाघ बिबटे च्या हमल्यात मेल्यावर पंचनामे, कॅमेरा चेकींग यात या व्यस्ततेमुळे त्यांनी ती नोंदणी करून डेपोमध्ये जमा केली नसावी. मात्र त्यांच्यावर चोरीचा आरोप लावणे चुकीचे असून योग्य पद्धतीने तपास करून त्यांची नियुक्ती करावी असे लोकांनी पाठविलेल्या शिष्टमंडळाने मुख्य वनसंरक्षक श्री एन.आर.प्रविण यांच्या सोबत चर्चा करून परिसरातील प्रतिष्ठित 251 लोकांच्या सह्या असलेले निवेदन यदूनाथ लेंझे जिवनापुर, रमेश डाहारे आलेवाही, रामदिन नान्ने , विनोद मडावी जिवनापूर, मंगेश बोरेवार जिवनापुर, गोपाल कूभंले वाठोणा, मिनेश कूभंले वाठोणा, महेश बोरकर सावरगाव, यांनी  एन.आर.प्रविण मुख्य वनसंरक्षक वन विभाग चंद्रपूर,यांच्या कडे निवेदन सोपविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here