9 फुट लांब अजगराला ‘स्वाब नेचर केअर संस्थां’च्या सदस्यांनी दिले जिवदान

0
346

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिटातील सायगाटा तलावात मासे पकडणाऱ्या मासेमारांच्या जाळ्यात अडकलेल्या नऊ(९) फूट लांब व साडेबारा(१२.५( किलो वजनाच्या अजगर सापाला स्वाब नेचर केअर संस्थेच्या सदस्यांनी जाळातून सोडवून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले.

यावेळेस स्वाब नेचर केअर चे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य महेश बोरकर, विकास बोरकर ,गोपाल कुंभरे, श्रेयस कायरकर, सचिन रामटेके, रामदीन, तर वन विभागाचे वन रक्षक श्री एस . बी. पेंदाम यांच्या उपस्थितीत हे साप जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here