TATR मध्ये जागतिक व्याघ्र दिन उत्साहित साजरा

0
162

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग): ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील मोहर्ली सभागुह मध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्य आज दि. २९ जुलै २०२३ रोजी केक कापून, तसेच ताडोबातील वाघाचे चित्रपट हॉल मध्ये दाखविण्यात आले आणि ताडोबाच्या मोहर्ली कोअर गेट पासून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाची सुरुवात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सायकल सवार यांना रवाना करण्यात आले व तसेच पर्यटक मार्गदर्शक यांच्या हस्ते केक कापण्यात आले.

इको प्रो अध्यक्ष एवं NTCA प्रतिनिधी बंडू धोतरे यांनी व्याघ्र दिना निमित्य सर्व उपस्थितांना म्हणाले की, वाघ हा सर्व प्राण्यांच्या प्रतीक आहे आणि त्याचे संरक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आपण व्याघ्र दर्शन करण्यास पैसा खर्च करतो आणि त्याला सफारी मध्ये जिप्सी जवळ बघून फार खुश होतो आणि तोच वाघ जेव्हा जंगला बाहेर शेतात येतो तेव्हा लोक त्यांचे स्वागत काट्याने करते. आपण बघतो सध्या मानव वन्यजीव संघर्ष वाढतंच आहे.त्याला रोखण्यासाठी वनविभाग, NGO व ग्रामस्थ सतत प्रयत्न करीत आहे. तेव्हा आपण सगड्यांनी व्याघ्र संरक्षणासाठी मदत करावे.

“जागतिक व्याघ्र दिनाची सुरुवात साधारण 2010 मध्ये सुरू झाली. जगात ज्या देशांमध्ये वाघ आढळत होते असे 13 देश एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली आणि त्या परिषदात ठरविण्यात आले की, येत्या 10 वर्षात वाघाची संख्या दुप्पट करण्याचे ठरविण्यात आले होते . 2022 ऐवजी 2020 मध्येच वाघाची संख्या दुप्पट झाली. वेळेच्या पूर्वीच वाघाची संख्येत वाढ झाली. आपल्या देशामध्ये साधारण 51 व्याघ्र प्रकल्प आहे आणि वाघाची संख्या 3500 च्या सुमारास आहे. वाघाची संख्या जेवढी ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये तेवढीच बाहेर चंद्रपूर मध्ये आहे. जी संख्या आपण बघतो त्यांचे संगोपन करणे वनविभागच नाही तर सर्वसाधारण जनतेची देखील आहे. आपण बघतो वाघाची संख्या जेवढी वेगात वाढत आहे तेवढ्याच वेगात कमी देखील होऊ शकते असे अनेक उदाहरण आपल्या समोर आहे जसे पन्ना व्याघ्र प्रकल्प, सरिस्का व्याघ्र प्रकल्प त्याची वाघाची संख्या शून्य झाली होती ते पण फार कमी कालावधीत मध्ये  झाली होती. व्याघ्र संरक्षणासाठी  सर्व यंत्राने काम करीत आहे कारण सर्वाना माहीत आहे की आपण जर संरक्षणाच्या  उपाययोजना मध्ये आपल्या वृत्ती मध्ये जरापण आळस केले तर वाघाची संख्या कमी होऊ शकते किंवा शून्य देखील होऊ शकते. आपण बघतो वाघ हा खूप नाजूक प्राणी आहे. फक्त आपल्या दिसतो वाघ शिकतो  प्राण्यांना व माणसाला मारतो. पण त्याला देखील संरक्षणासाठी मानवांची गरज आहे.
त्यासाठी आपण जे आजच्या सारखे व्याघ्र दिवस  साजरा करतो ते फार महत्त्व पूर्ण आहे. तसेच वाघाची संख्यात कमी होऊ नये याकरिता आपण सर्वांनी मदत करण्याची गरज आहे. आपल्या परिसरातील गावामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात बघतो जे लोकांमध्ये वाघाच्या संरक्षणाच्या बाबतींत जे काही सकारात्मक भूमिका आहे.  ते देशात नाही तर जगामध्ये कुठेच बघायला मिळत नाही. जगातील 70 % वाघाची संख्या आपल्या देशामध्ये आहे आणि त्यात महाराष्ट्राचा खूप मोठा मोलाचा योगदान आहे 450 पेक्षा जास्त वाघ महाराष्ट्रा मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये 70% वाघ आपल्या चंद्रपूर मध्ये आहे. दुसऱ्या राज्यातील व्याघ्र प्रकल्पात वाघाची संख्या वाढवण्याकरिता आपल्या चंद्रपूर येथील वाघ तेथे स्थलांतर करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये देखील करण्यात येईल जेणेकरून तेथील संख्येत देखील वाढ होईल. असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी म्हटले”.

तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचे उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक यांनी देखील जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिले व व्याघ्र संरक्षणासाठी स्थानिक लोकांसोबत जे पार्टनरशीप ते असेच कायम राहावे जेणेकरून भविष्यात  वाघ संरक्षणात मदत होईल असे ते म्हणाले.

यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, रणजित यादव IAS, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोअर चे ACF महेश खोरे, मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, NTCA प्रतिनिधि एवं इको प्रो अध्यक्ष  बंडू धोतरे, क्षेत्र सहायक मोहर्ली (बफर) एस. डी.जुमडे, एस.एल. बालपाने क्षेत्र सहायक आगरझरी, व्ही. बी. सोयाम क्षेत्र सहायक मोहर्ली (कोअर), एम. एफ. वाळके वनपाल व्याघ्र प्रकल्प मोहर्ली, पी.पी.ढाले क्षेत्र सहायक पद्मापुर, एम. ए. मंगाम वनरक्षक सितारांपेठ, एस. सी. जांभुळकर वनरक्षक तपासणी नाका, एस. जे.पिदूरकर वनरक्षक तपासणी नाका, एस.ए. दमके वनरक्षक तपासणी नाका, एस. टी. बुरडकर वनरक्षक, ए. व्ही.आईटलावार वनरक्षक-१ , कु. एस. ए.महाजन वनरक्षक अंधारी, एस.आर. पठ्ठीवार वनरक्षक आंबेझरी, ए.एन.ताजने वनरक्षक पद्मापूर-२, पी.पी.दरेकर वनरक्षक अडेगाव, व्ही. के. जनबंधू वनरक्षक मुधोली, आर.बी. वानखेडे  वनरक्षक आंबेगड, एस. डी.मरस्कोल्हे वनरक्षक ठाणेगाव, ए. के. राठोड वनरक्षक  मोहर्ली-२, ए.व्ही. टेकाम वनरक्षक  गिरघाट, बी.एम. गोघते वनरक्षक आगरझरी-१, बी.बी. येडमे वनमजूर, बी.जी. कोडापे वनमजूर, प्रफुल सावरकर एज्युकेशन ऑफिसर TATR, मोहर्ली गट ग्रामपंचायत सरपंच सुनीता कातकर, मुधोली ग्रामपंचायत सरपंच बंडू नन्नावरे, माजी उपसरपंच राजू ढवडे, EDC अध्यक्ष मधुकर कोवे सितारामपेठ, EDC अध्यक्ष डॉ.राय अडेगाव,  बटरफ्लाय गार्डन येथील adventure camp चे मार्गदर्शक, रिसोर्ट एवं होमस्टे मालक-चालक, मोहर्ली कोअर एवं बफर पर्यटक मार्गदर्शक , PRT टीम सदस्य, वनमुजर तसेच मोहर्ली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर) संतोष थिपे यांनी केले तर आभार प्रदर्शन वनरक्षक एम.ए. मंगाम यांनी केले. तसेच कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर) संतोष थिपे व त्याच्या सहकाऱ्याने परीश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here