वाघाच्या हल्ल्यात मूल तालुक्यातील जाणाळा येथील शेतकरी ठार

0
162

चंद्रपूर : मूल तालुक्यातील जाणाळा येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना आज दि. 29 डिसेंबर 2023 रोजी उघडकीस आली.

सदर घटना ही कक्ष क्र. 523 मध्ये सुभाष कडपे वय 40 वर्ष शेतात कामाकरिता गेले असता अचानक त्याच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले असल्याची घटना काल दि. 28 डिसेंबर रोजी काम वरून परत न आल्याने शोधाशोध करण्यास गेले असता आज सकाळच्या सुमार मृत अवस्थेत आढळून आला.

सदर घटनेची माहिती वनविभागा मिळताच घटना स्थळी पाहणी करून पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे. मूल ग्रामस्थानी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here