सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मांदुळ सापांची जप्ती; पाच आरोपींवर गुन्हा दाखल

0
412

जिल्हा प्रतिनिधी :

ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगाव, नियतक्षेत्र रत्नापूर येथे वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीनुसार कारवाई करत अनुसूची-१ मधील संरक्षित ‘मांदुळ’ प्रजातीचे सात साप जप्त केले. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

वनपरीक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचारी गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची चौकशी व तपास करण्यात आला. तपासादरम्यान रत्नापूर येथील श्री. हिवराज शामराव गहाणे यांच्या घरी प्लास्टिक पिशवीत मांदुळ प्रजातीचे सात साप आढळून आले.

या प्रकरणी आरोपी 1) अशोक धोडुजी आत्राम (वय 59, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर), 2) ईश्वर दुर्याधन शेंडे (वय 53, रा. धामनगाव चक, ता. नागभीड, जि. चंद्रपूर), 3) निर्मल अनिल हालदार (वय 60, रा. नेताजीनगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली), 4) सरोज शिबु मालो (वय 38, रा. सुंदरनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) आणि 5) अनिल गोविंदा मेश्राम (वय 39, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 09112/227794 दिनांक 10 फरवारी 2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सिंदेवाही यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई मा. श्री. कुमारस्वामी एस. आर., उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक अरविंद जे. (प्रादेशिक व वन्यजीव) व एम. बी. गायकवाड (तेंदू) यांच्या सहकार्याने पार पडली. वनपरीक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांच्या नेतृत्वाखाली परीविक्षाधीन वनपरीक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, आरआरयू टीम व वाहनचालकांनी कारवाईत सहभाग घेतला.

प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून वनविभागाकडून अधिक माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here