विहिरीत पडून वाघीनीचे मृत्यू

0
164

मेंडकी वनपरिक्षेत्रातील घटना

तळोधी बा (यश कायरकर)

ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या  उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मेंडकी नियत क्षेत्रात मेंडकी गावाच्या रामाजी ठाकरे यांचा गट क्रमांक ४५१ या शेतातील विहिरीत पडून  वाघीनीचे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.


सकाळ सुमारास जंगल परिसरातील गस्त करत असताना वनरक्षक लाडे यांना दुर्गंधी आली असता त्यांनी परिसरातील शेतातील विहिरीत पाहणी केली असता त्यांना मृत अवस्थेत वाघ आढळून आला.
सदर मृत वाघीनीचे अंदाजे वय ४ ते ५ वर्षे आहे. ही वाघिन ३-४ दिवसापूर्वी विहिरीत पडलेली असावी असा अंदाज आहे.

यावेळी डॉ.लोंढे मैडम, पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही, डॉ.पराते पशुधन विकास अधिकारी ब्रह्मपुरी, डॉ. लाडे, पशुधन विकास अधिकारी असे नवरगाव यांनी मौका पंचनामा व शविच्छेदन करून सविच्छेदन नंतर जाळण्यात आले.
यावेळेस उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक शेंदुरकर, सालकर सर वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदेवाही, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक, बंडू धोतरे इको प्रो अध्यक्ष , यश कायरकर, व उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण कर्मचारीच्या उपस्थितीत पंचनामा व शवदहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here