शेतातील जिवंत विद्युत प्रवाहाच्या तारामुळे नर आस्वलाचा मृत्यू

0
240

मूल : अंतरगाव पारडवाही येथील शेतात वन्यप्राण्यापासुन रक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारामुळे अंदाजे दोन वर्षाच्या नर आस्वलाचा मृत्यू झाले असल्याची घटना दि. २/३/२०२३ ला उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार मूल येथील शेतकरी सूधीर कावळे यांनी आपली शेती सुभाष नगर, मूल येथील गोपीनाथ मंगरू शेंडे याला शेती करण्यासाठी दिली होती. गोपीनाथ शेंडे यांनी वन्यप्राण्यापासुन मका पीकाच्या रक्षणासाठी महावीतरणच्या पोलवरून आकडा टाकुन शेताच्या सभोवताल तार लाऊन त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. त्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने अस्वलीचा मृत्यू झाला.


सदर घटनेची माहिती वन विंभागाला मिळताच मूलचे क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले व  या सर्व घटनेची माहिती विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे व चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी गोपीनाथ मंगरू शेंडे याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्या कडुन विद्युत प्रवासासाठी वापरलेले वायर आणि आकडा टाकण्यासाठी वापरलेली काठी जप्त करण्यात आली.
यावेळी घटनास्थळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे, महावितरण मूल चे सहाय्यक अभियंता पंकज उजवने, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, प्राणी उपचार केंद्र चंद्रपूर चे डॉक्टर कुंदन पोडचलवार, क्षेत्रसहाय्यक मोरेश्वर मस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोले, वनरक्षक राकेश गूरनुले व वनमजूर आदी उपस्थित होते.मृत अस्वलीला मुल येथे आणून शवविच्छेदन करण्यात आले व नंतर दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here