वाघाच्या हल्ल्यात इसम ठार नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना

0
149

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):
नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मिंडाला वनक्षेत्र, मांगली बीट येथील कक्ष क्र. ७२१ दि. २५ फरवरी मध्ये  सायंकाळी ४.०० वाजताच्या  सुमारास वाघाच्या हल्ल्यात ठार केल्याची घटना उघडकीस आली.

सदर घटनेत मृतकांचे  नाव किशोर दादाजी वाघमारे वय (37) वर्ष असून त्याचे शव सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास कक्ष क्र.७२१ मध्ये आढळून आले. मृतकाच्या परिवाराला वन विभागाच्या वतीने २०,०००/-(वीस हजार रुपये) ची तात्काळ मदत स्वरूपात देण्यात आले.
यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. हजारे, क्षेत्र सहाय्यक तावाडे, वनरक्षक सी. एफ. कुथे, जीवतोड, लटपटे, खोब्रागडे, नवघडे आदि उपस्थित होते. पुढील कारवाही वनविभागा तर्फे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here