वाघाचा प्रेमीयुगुलावर प्राणघातक हल्ला

0
1218

वडसा :-  तालुक्यातील उसेगाव जंगल परिसरात गेलेल्या  प्रेमीयुगुलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक 3 मे 2022 रोजी उघडकीस आली.

 

प्राप्त माहितीनुसार मृतक अजित सोमेश्वर नाकाडे वय (21) वर्षे रा. चोप (कोरेगाव) असे असून हा आपल्या प्रियशी सोबत जंगलात गेले असता अचानक वाघाने हल्ला करून  प्रियकर जागीच ठार केले असुन मुलगी गंभीर जखमी झाली आहे . तिचा जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
सदर घटनेत वाघाने प्रियकर ला जंगलात फडफडत नेले असल्याची माहिती गावकरी व वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांना मिळताच त्याचा शोध घेणे सुरू केले असता तब्बल दोन-अडीच तासांनी अजितचा मृतदेह जंगलात सापडला. वनविभागाने घटनास्थळी  मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले.
प्राप्त माहितीनुसार उसेगाव जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती सगळ्यांना आहे व त्या परिसरात वाघाचा वावर असल्याचे फलक लावलेल्या जागेवर त्याने  किरायाची गाडी पार्क करून मुलीला जंगलात घेऊन गेले व त्यानंतर हा सर्व प्रकार घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here