विद्युत विभागाच्या निष्काळजीपणेने विद्युत शॉक लागून बिबट्याचा मृत्यू

0
1072

(सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील खातगांव येथील घटना, विद्युत विभाग याकरीता जिम्मेदार)

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):

आज दि. 04 नोव्हेंबर 2023 रोजी सिंदेवाही वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र डोंगरगांव मधील मौजा भेंडाळा गट क. 12 श्रीमती. कमलाबाई महादेव पेंदाम यांचे शेतामध्ये 11 के. व्ही. डीस्ट्रीब्युशन लाईन जिवंत विद्युत ट्रान्सफॉर्मर वर बिबट (मादी) व माकड (बंदर) मृत अवस्थेत आढळून आले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सिंदेवाही हे अधिनिस्त वनकर्मचारी व RRU चमु सिंदेवाही यांच्यासोबत घटना स्थळी पोहचले व सदर घटनेची पाहणी केली असता, घटना स्थळावर १ बिबट (मादी) व माकड (बंदर) मृत अवस्थेत असल्याचे आढळले.

सदर घटनेची माहीती वरिष्ठ अधिकारी व विज वितरण विभाग, सिंदेवाही यांना भ्रमणध्वनी व्दारे कळविण्यात आली. त्यानंतर मौका पंचनामा केले असता सदर बिबट्याचे सर्व अवयव शाबुत असल्याचे निर्देशनास आले. यावेळेस सर्व उपस्थित अधिकारी यांच्या समक्ष मौका पंचनामा नोंद करण्यात आला.
सदर मृत बिबट्याला  (लकडा डेपो) मध्यवर्ती काष्ट भांडार, सिंदेवाही येथे डॉ. विनोद सुरपाम, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, सिंदेवाही, डॉ. शालीनी लोंढे, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही यांनी सदर वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करून उत्तरिय तपासणी करीता नमुने (विसेरा) घेण्यात आले. शवविच्छेदनाची संपुर्ण कार्यवाही करून वन्यप्राण्यांचे संपूर्ण अवयव पूर्णपणे जाळण्यात आले .
यावेळी मा. एम. बि. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी विवेक करंबेकर मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी वनविभाग व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी यश कायरकर अध्यक्ष स्वाब नेचर केअर फाउंडेशन, सदस्य जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, महेश बोरकर, गणेश गुरनूले, तुषार शिवनकर, आकाश मेश्राम, शुभम निकेशर व विज वितरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
*सदर घटने करीता विद्युत विभागच जिम्मेदार*
विशेष म्हणजे तीन दिवसापूर्वी पासूनच या डीपीवर एक बंदर करंट लागून मृत अवस्थेत आढळून आला होता आणि ते पण गावातील एका घराजवळ शेतात असल्यामुळे गावातील लाईन सतत ये जा करत होती  तरी मात्र विद्युत विभागाने त्याकडे निष्काळजीपणे सपशेल दुर्लक्ष केला आणि त्या मृत बंदराला खाण्याच्या नादात रात्रीच्या सुमारास डीपीवर चढलेल्या एका मादा बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. त्याचे वय अंदाजे एक ते दिड वर्ष होता. यामध्ये पुन्हा विद्युत विभागाची दिरंगाई निदर्शनास येते आणि याच दिरंगाई मुळे वर्षाला शेकडो वन्यजीव मारले जातात, याचेच उदाहरण द्यायचे झाले तर गत महिन्यामध्ये ३ आक्टोंबर ला चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली व्ह्रदयविदारक घटना म्हणजे एका *हत्तीचा* करंट लागून मृत्यू  झाली आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा करंट लागून एका *वाघाचा* मृत्यू, यातच दोन दिवसापूर्वी चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे एका दहा वर्षीय *मुलाचा* शेतामध्ये लावलेल्या अवैद्य करंट ला लटकून मृत्यू झाल्याची घटना उजागर झाली.
अशा वर्षालगत शेकडो घटना विद्युत विभागाच्या निष्काळजी पणामुळे घडत असतात. आणि  अशा घटना टाळून नेण्याकरता सतत वन विभागात गस्त घालून देखरेख करत असतो. मात्र विद्युत विभाग याकडे कधीच गांभीर्याने न पाहत व कोणत्याही घटना झाल्यास त्याचे खापर हे वनविभागावर फोडले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here