जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोटॅनिकल गार्डन बल्लारशाचे देवराव टेकाम वनरक्षक यांचे सत्कार

0
268

आज दिनांक 5 जून 2021 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे बल्लारपूर बाटनिकल गार्डन मध्ये अत्यंत उत्कृष्ट कामे केल्या बद्दल मध्यचांदा वनविभाग, चंद्रपुर तर्फे देवराव टेकाम वनरक्षक यांना मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.


देवराव बाजीराव टेकाम हे 2004 बॅचचे वनरक्षक असून त्यांनी मागील 4 वर्षापासून कठोर परिश्रम करून बॉटनिकल गार्डन, बल्लारशा यशस्वीरित्या केलेले आहे. यापूर्वी टेकाम वनरक्षक यांनी पोंभुर्णा येथील निसर्ग पर्यटन संकुल येथे काम करून ते यशस्वीरित्या पूर्ण करून दिल्यानंतर त्यांच्यावर बॉटनिकल गार्डन बल्लारशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती जबाबदारी त्यांनी स्वीकारून दिवस-रात्र न पाहता जेव्हा केव्हा वेळ पडेल त्या वेळेला हजर राहून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे बोटॅनिकल गार्डन यशस्वी केलेले आहे. त्यांनी 3 वर्षात विजा पासून तयार केलेल्या रोपट्याची उंची 10 ते 12 फुटा पर्यंत उंच व 15 ते 20 cm गोलाई चे विविध प्रजाती चे वृक्ष तयार केलेले आहेत. प्रत्येक्षात पाहिल्यावर कोणी ही असं म्हणणार नाही की सदर झाड हे तीन वर्षातच बिजाई पासून तयार केलेले आहे.
परंतु ही अशक्य बाब देवराव टेकाम वनरक्षकांनी शक्य करून दाखवले आहे. त्या तयार केलेल्या वृक्षांचे बिजाई लावल्या दिवसापासुन पासून तर आज पर्यंतचे लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाचे GPS रिडींग सह नोंद व त्याचे रेकॉर्ड करून तीन वर्षात इतके सक्षम रित्या बिजाई चे झाड तयार केल्याचे त्यांनी सिद्ध करून दिले आहे, त्यांचे हे असेच सदैव चालू राहावे हीच त्यांना शुभेच्छा
यावेळेस अरविंद मुंडे DFO मध्य चांदा वनविभाग, संतोष थिटे वनपरिक्षेत्र अधिकारी, कोडापे, गर्कल शर्मा  उपविभागीय वन अधिकारी राजुरा आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here