नागभीड येथे मिळाला 6.6 फुट लाबीचा नाग साप, विदर्भातील सर्वांत मोठा असल्याचा अंदाज

0
465

( ‘झेप’ च्या सदस्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडून दिले जीवदान.)

तळोधी बा.; आज पर्यंत विदर्भामध्ये सर्वात मोठ्या लांबीचा नाग  ( indian Cobra) साप हा आपल्या नागभीड ला पकडल्या गेला आहे याची लांबी 6.6 फूट एवढी मिळालेली आहे, तसेच आजपर्यंत वनविभागाकडे नोंदणी केल्या प्रमाणे सर्वात मोठ्या लांबीचा  नाग साप हा ब्रम्हपुरी परिसरामध्ये 6.3 फूट एवढ्या लांबीचा मिळाल्याची नोंद आहे.

एवढ्या मोठ्या लांबीचा *नाग* साप अख्या विदर्भामधून नागभीड परिसरामध्ये आढलेला आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
हा साप नागभीड परिसरामध्ये नवखळा ह्या गावी मिळाला आहे या सापाला सर्पमित्र व झेप घे अध्यक्ष, पवन नागरे यांनी लोकवसाहती मध्ये पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले .
यावेळी क्षितिज गरमडे, गुलाब राऊत, तुषार गजभे, निखिल देशमुख होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here