डोंगरगाव बिटात रेल्वेच्या धडकेत सांबराचा मृत्यू

0
196

तळोधी बा. :

ब्रम्हपुरी कडून सिंदेवाही कडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत  सांबारचा मृत्यू ची घटना काल दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी उघडकीस आली.
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डोंगरगांव (पळसगाव) बिट, कक्ष क्र.२५९  मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एका ७ वर्षे वयाचा पुर्ण विकसित सांबर हा  सिंदेवाही कडे जाणाऱ्या रेल्वे ने धडक दिली व ४०-५० मिटर अंतरापर्यंत घासत नेले असल्याने सांबरचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सिंदेवाही वनपरिक्षेत्र  रेल्वे च्या धडकेत वन्यप्राण्याची मृत्यूची ही तिसरी घटना असल्याचे सूत्राद्वारे कळले आहे.

तसेच सदर घटनेचा मौका पंचनामा करून मृत सांबराला जमिनीत पुरून देण्यात आले.
सदर घटनेच्या वेळी  सिंदेवाही क्षेत्र चे क्षेत्र सहाय्यक दिपक हटवार, वनरक्षक चहांदे, डॉ. शालिनी लोंढे, पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही, वन्यजीव प्रेमी यश कायरकर अध्यक्ष स्वाब नेचर केअर संस्था व इतर सदस्य मोठया संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here