गोंदिया  मोरगाव अर्जुनी रेंज मध्ये नर वाघाची शिकार

0
777


आज दिनांक 13 जनवरी 2022 रोजी  बिट- रामघाट-1 ,
कक्ष क्रमांक 254 B राखीव वनामध्ये गोंदिया  मोरगाव अर्जुनी रेंज मध्ये नर वाघाची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार नर वाघ साधारणतः 4 ते 5 वर्षाचा होता. त्याचा मृत्यू  विद्युत प्रवाहच्या ताराने झाले असल्याचे ग्राह्य धरले जात आहेत.

मृत वाघाचा खालच्या जबड्याचे दात साबूत असून वरील जबड्याचे दात नसल्याचे निर्देशनात आले असून तसेच त्याचा पायाचा पंजा कापण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे सूत्रा द्वारे लक्षात आले मृत वाघाची शवविच्छेदन  14 जानेवारी 2022 रोजी करण्यात येत आहे त्यानंतर स्पष्ट होईल की वाघाची मृत्यू कशाने झाली आहे. पुढील तपास वनविभागा तर्फे  सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here