
चंद्रपूर : वनपरिक्षेत्र कार्यालय मूल बफर व संजीवन पर्यावरण संस्था मूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्राण्याची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन आज दि. १४/९/२०२२ रोजी करण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांनी विद्यार्थ्यांना चित्ताविषयी थोडक्यात माहिती दिली.
चित्ता, भारतातील नामशेष प्राणी, मध्य प्रदेशातील शिवपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात वनविभागामार्फत पुनर्वसन केले जात आहे.
त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परदेशातून चित्यांच्या चार जोड्या दि.17 सप्टेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये रिलीज करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाला कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता वाळके, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, मनोज रणदिवे, प्रशांत केदार, प्रभाकर धोटे, अंकुश वाणी, अक्षय दुम्मावार, रुपेश खोब्रागडे, प्रतीक लेनगुरे, हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, जय मोहूर्ले,यश केदार व कर्मवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक गणेश आगलावे यांनी केले.
