Google search engine
Home Tourism ताडोबा सफारीत क्रूझर गाड्यांच्या व्यवस्थेबाबत सकारात्मक बदलाची अपेक्षा; पर्यटक व स्थानिकांचा प्रतिसाद...

ताडोबा सफारीत क्रूझर गाड्यांच्या व्यवस्थेबाबत सकारात्मक बदलाची अपेक्षा; पर्यटक व स्थानिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक

0
230

चंद्रपूर : (मोहम्मद सुलेमान बेग)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी व्यवस्थेबाबत पर्यटक, होमस्टे व रिसॉर्ट संचालक तसेच स्थानिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. सध्या सफारी मधील क्रूझर गाड्या चंद्रपूरच्या स्थानिकांसाठी राखीव ठेवल्याने काही गेटवर वाहनांचा वापर पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे निरीक्षणात आले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून काही क्रूझर गाड्या न वापरता गेटवरच उभ्या असल्याचे ही लक्षात येत आहे.

दरम्यान, अनेक रिसॉर्ट व होमस्टे मालकांकडून सफारी बुकिंग मिळत नसल्याने होमस्टे व रिसॉर्ट खाली आहे. पर्यटकांकडूनही, “काही क्रूझर ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध झाल्यास सफारीला अधिक पर्यटक भेट देतील,” अशी मागणी होत आहे.

पर्यटक व स्थानिकांच्या मते, एकूण चार क्रूझरपैकी दोन क्रूझर स्थानिकांसाठी राखीव ठेवून उर्वरित दोन क्रूझर ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यास वनपर्यटनात अधिक गतिमानता येऊ शकते. यामुळे –

* सफारी बुकिंग वाढेल,

* पर्यटकांची उपस्थिती वाढेल,

* स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील,

* आणि वनविभागाचे उत्पन्नही वाढेल.

या सर्व सकारात्मक सूचना वनविभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून, अनेकांचा विश्वास आहे की वनविभाग पर्यटकांच्या सोयीसाठी यावर संवेदनशीलतेने विचार करेल.

ताडोबा प्रकल्प व्यवस्थापन आणि स्थानिक हितसंबंधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून वनपर्यटन अधिक सुगम, सुटसुटीत आणि पर्यटकांना आकर्षित करणारे होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here