संरक्षित वनामध्ये शिकारीच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपींना वनविभागाने लावल्या बेडया

0
328

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर)
शिवणी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना उपक्षेत्र कुकडहेटी येथील नियतक्षेत्र पेटगाव येथील संरक्षित वन क्रमांक 813 व खाजगी शेत सर्व्हे क्रमांक 247 मध्ये रात्री 1.00 वाजता प्रवेश करीत असलेल्या 3 आरोपींना  वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन तपासणी केली असता सदर आरोपीकडून नायलॉन जाळी व वाहतुकीकरीता वापरण्यात आलेली मोटार सायकल MH-34-BK-3292 TVS Victor जप्त करण्यात आली.

चौकशी दरम्यान आरोपीने वन अपराधामध्ये सहकार्य करीत असलेले नानाजी गणपत मुंडरे यांचे नाव सांगितले. त्यानुसार त्यांना पण ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपी 1) विलास महादेव चौधरी, 2) विनोद मनोहर मुंडरे, 3) निलकंठ तुकाराम भोयर व 4) नानाजी गणपत मुंडरे हे मौजा पेटगाव येथील रहिवासी असुन आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सदर गुन्हयाबाबत त्यांचे विरुध्द विविध कलमांच्या अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच त्यांनी यापूर्वी सुध्दा शिवणी वनपरीक्षेत्रामध्ये वन्यप्राणी रानडुक्कराची शिकार केली आहे.त्यांच्या  विरुध्द वनगुन्हा नोंदविण्यात आले होते.सदर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील चौकशी  गुरुप्रसाद  उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व बापुजी येडे  सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-1) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात बि.के.तुपे, वनपरीक्षेत्र अधिकारी शिवणी करीत असुन    एस.बी.उसेंडी  क्षेत्र सहाय्यक कुकडहेटी, आर.यु. भरणे वनरक्षक पेटगाव, आर.यु. शेख  वनरक्षक मालबामणी,   एल.के. मेश्राम  वनरक्षक शिवणी, एस. जी. चहांदे वनरक्षक सिरकाडा, ए.डब्ल्यू.गायकवाड वनरक्षक पिपरहेटी  व शिवणी वनपरीक्षेत्रातील इतर वनकर्मचारी सहकार्य करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here