कराड येथे वाघ / बिबट नख विक्री करताना दोन आरोपी अटक

0
587

एकूण 11 वाघ / बिबट नख्या जप्त
एक वाघ नख लॉकेट मध्ये  तर  इतर सुट्टे 10 वाघ / बिबट नखे असे एकूण 11 वाघ / बिबट नख्या जप्त करण्यात आले आहेत.

दि.16.ऑगस्ट 2021 सोमवार रोज मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराड येथील बुधवार पेठ येथे असलेल्या कृष्णा नाका परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचूंन दोन आरोपीना अटक करण्यात आली यात दिनेश बाबूलाल रावल वय 38 राहणार .सोमवार पेठ कराड व अनुप अरुण रेवणकर वय 36 राहणार रविवार पेठ कराड या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील अत्यंत मोठी कारवाही आहे.यात वाघ / बिबट नख्यांचे बाजर भाव अमूल्य आहे.यात आंतरराज्य टोळी सहभागी असल्याचा संशय आहे.

आरोपींनी ह्या पूर्वी असे कृत्य केले असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वनविभाग  व  वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो चे अधिकारी हे पकडलेल्या आरोपींवर पाळत ठेऊन होते.
दि.16 ऑगस्ट 2021 रोजी आरोपी हे वाघ/बिबट नख विक्री करण्यासाठी तयार झाले. गुप्त माहिती वरून कृष्णा नाका कराड येथे सावित्री कॉर्नर बिल्डिंग मध्ये असलेल्या सखी लेडीज शॉपी येथे एक आरोपी दिनेश बाबूलाल रावल हा दोन वाघनख्या घेऊन विक्रीसाठी आला त्यावेळेस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला झडप घालून पकडले, पुढे त्याला ताब्यात घेऊन लगेच दुसऱ्या आरोपी अनुप अरुण रेवणकर याच्या  रविवार पेठ येथील काझी वड्या जवळ असलेल्या मयूर गोल्ड या दुकानात धाड टाकल्यावर त्याच्या जवळ 8 वाघ/ बिबट नख्या सापडले.
पुढे झडती करताना आरोपीच्या गळ्यात एक वाघ नख सापडले.असे एकूण 11 नख सापडले.


दोघांना ही वनविभागा कडून अटक करून वन्यजीव अधिनियम 1972 नुसार POR क्रमांक 14/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्याच्याय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम  1972 अन्वये कलम 9, 39, 44, 48अ, 49अ, 49ब,50, 51, 52 नुसार गुन्हा दाखल केले आहे.
मा. श्रीमती .सं. सा. वनकोरे दुसरे प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी कराड यांच्या कोर्टात हजर केले असता त्यांनी दि.20 ऑगस्ट 2021 पर्यंतची PC देण्यात आली आहे. चार दिवसांची वन कोठडी (PC) मिळाली आहे.

सदर कारवाई प्रकरणी उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक  महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई चे इन्स्पेक्टर डोकी आदीमाल्ल्य्या, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , मेळघाट व्याघ्र प्रकालचे स्पेशल सेलचे वनरक्षक आकाश सारडा तसेच वनपाल आनंदा सवाखंडे,  वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते,अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम,भारत  खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके, हे सहभागी झाले होते.

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे.  वाघ अथवा बिबट्या सारख्या प्राण्यांना मारून त्यांचे नाख्यांचे / दातांचे लॉकेट करून गळ्यात घालणे हा देखील मोठा व अजामीनपात्र व दाखल पात्र गुन्हा आहे. वन्यजीव(संरक्षण) अधिनियम 1972 नुसार शेड्युल 1 मध्ये वाघ व बिबट ह्या प्राण्यांना उच दर्जाचे रक्षण कायद्यात दिलेले आहे. जर कोणाकडेही असे वाघ नख्या असलेले लॉकेट असेल अथवा कोणी शिकारी करत असेल तर गोपनीय माहिती  9422004800 वर कळवावी नावाची गोपनीयता ठेवली जाईल.

रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा
तथा
सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो नवी दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here