सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार

0
451

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :-

ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीट-2  कक्ष क्र. 254 मध्ये सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार वय (51) वर्ष असून राहणार पळसगाव (जाट) याला वाघाने हमला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार हा आपल्या नेहमीच्या काही साथीदारांसोबत जंगल परिसरातील कच्चेपार बीटा मध्ये नेहमी प्रमाणे पहाटेच्या सुमारास सरपण गोळा करण्यास जंगलात चालत असतांना  नाल्यालगत पाण्याजवळ बसलेल्या वाघा समोर अचानक समोर गेल्यामुळे वाघाने हमला करून श्रीकृष्ण कोठेवार याला ठार केले.
यावेळेस सदर घटनास्थळा जवळ असलेल्या साथीदारांनी मात्र आरडाओरडा करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने मृतदेह  जवळपास 100 मीटर पर दूर पर्यंत उचलून नेला तोपर्यंत श्रीकृष्ण हा मृत पावलेला होता.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर  यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही, के.डी.मसराम आपल्या चमू सोबत घटनास्थळी दाखल झाले.
यावेळेस चौधरी वनरक्षक कच्चेपार बिट, चहांदे वनरक्षक डोंगरगाव बीट, पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही, फुलझले वनरक्षक सिंदेवाही बिट, तोडसाम मॅडम कारगाटा वनरक्षक व स्वाब संस्थेचे  जिवेश सयाम, शुभम निकेशर, कैलास बोरकर, गोपाल कुंभले, यश कायरकर, मिनेश कुंभले, आदि स्वाब संस्थेचे सदस्य घटना स्थळी उपस्थित होऊन सिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती दिली व मौका पंचनामा करून सिंदेवाही    येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्याकरिता आणण्यात आले.
मृतकाच्या पीडित परिवाराला वन विभागातर्फे तात्काळ मदत म्हणून 25,000/- (पंचवीस हजार रुपये) देण्यात आले. तसेच वनविभागामार्फत मृतकाच्या परिवाराला मिळणाऱ्या 25 लाख रुपये सहाय्यता निधीतून उर्वरित 24 लाख 75 हजार रुपये लवकरात लवकर वनविभागातर्फे पिडीतांच्या परिवाराला देण्यात येणार आहे.
“तसेच या परिसरात वाघांचा वावर असल्यामुळे लोकांनी जंगलात सरपण गोळा करण्यास किंवा कुठल्याही प्रकारच्या कामासाठी जंगलात जाऊ नये.” असे वनविभागा तर्फे परिसरातील लोकांना सूचना देण्यात  आली व सदर घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावून घटनेस कारणीभूत असलेल्या वाघाची ओळख पठविण्याकरिता हालचाली वर लक्ष ठेवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here