पवनपार मध्ये वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

0
472

सिंदेवाही : तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे तालुक्यातील गुंजेवाई उपवनक्षेत्र जवळील पवनपार गावातील एका इसमवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदर घटना आज दिनांक १९ एप्रिल २०२२ मंगळवार रोज सकाळच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव सुरेश लोनबले वय 52 वर्ष राहणार पवनपार असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सुरेश लोनबले हा मोहफुल वेचण्यासाठी शेतात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले व त्याला फरफरत नेले.
सदर घटनेची माहिती होतास पवनपार येथील तलाठी अक्षय झाडे व सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून पुढील तपास सुरू केले.
भविष्यात पुन्हा घटना होऊ नये म्हणून  गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here