वाघाच्या शिकार प्रकरणात मुद्देमालासह आणखी तिघांना अटक : नागपूर व यवतमाळ वनविभागाची संयुक्त कारवाई

0
320

नागपूर विभागाने गुप्त माहितीच्या आधारे हळदगाव टोल नाक्यावर (नागपूर वर्धा महामार्ग) वाघांच्या अवयवाची तस्करी करताना दि. 10 ऑक्टोबर 2021 रोज 7 आरोपी सह टवेरा वाहन क्र. MH-44-B 5152 व वाघाचे अवयव जप्त करण्यात आले.


तपास दरम्यान यवतमाळ, अमरावती व वर्धा जिल्ह्यातील आरोपी असल्याचे आढळून आले. उक्त प्रकरणातील 7 आरोपींना मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नागपुर यांचे न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना दिनांक 18 ऑक्टोबर पर्यंत वन कोठडीत सुनावण्यात आली. त्यानंतर सविस्तर तपासणी करीत असता वाघाचे शिकार केलेल्या घटनास्थळाची पाहणी केली असता आणखी यात काही आरोपींचा सहभाग असल्याच्या संशयावरून यवतमाळ वन विभागाशी संपर्क साधून पुढील आखणी करण्यात आली त्यानुसार नागपूर यवतमाळ वन विभागाचे संयुक्त प्रताप तयार करून आरोपींच्या घराचे व शिकार केलेल्या घटनांची शोध मोहीम राबविण्यात आली यात आरोपीने दाखविलेले ठिकाण मौजा किटा खापरी, कक्ष क्र.469 मध्ये वाघाच्या हाडे व नखे जप्त करून मोका पंचनामा करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरातून वाघाचे हाडे व नखे जप्त करण्यात आले. तसेच यामध्ये गुंतलेले आणखी काही आरोपीना ताब्यात घेऊन उर्वरित कारवाई करण्यात आली.
जप्त केलेल्या वाघाच्या अवयवांचे नमुने उत्तरीय तपासणी करण्याकरीता पाठविण्यात येणार आहे.
सदर कारवाई पी.कल्याणकुमार, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपुर वनवृत्त नागपूर, डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग, केशव वाबळे उपवनसंरक्षक यवतमाळ वनविभाग यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख एन.जी. चांदेकर, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास 2) उमरेड, संदीप गिले, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास 1) रामटेक एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, बुटीबोरी यांचा यांच्या समवेत अनंता दिघोडे सहाय्यक वनसंरक्षक, यवतमाळ, अमर सिडाम वनक्षेत्रपाल, यवतमाळ नेहारे क्षेत्रपाल यवतमाळ मडावी वनक्षेत्रपाल यवतमाळ, शेंडे, जाधव, मुंडे, दुर्वे, कुलरकर,पडवळ सर्व वनरक्षक यांनी धाड यशस्वी पार पाडली.
तसेच पुढील तपास एन.जी. चांदेकर, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास 2) उमरेड हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here