मद्यधुंद पर्यटकांच्या कारला गंभीर अपघात

0
1510

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा चे महत्त्वाचे गेट असलेल्या पद्मापूर गेट पासून 500 मीटरच्या अंतरावर काल दिनाक 21 मार्च रोजी रात्री 9.30 च्या सुमारास MH34 BR 6979 या कार ने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघाता मध्ये  दोन पर्यटक गंभीर जखमी झाल्याची माहिती असून पद्मपुर गेट इंजार्च धमके मॅडम यांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले दोन मदतनीसला घटनास्थळी  पाठविले आणि अपघातात जखमी झालेल्याना दुसऱ्या कार ने उपचारासाठी  रुग्णालयात पाठविले तसेच आपल्या वरिष्ठ अधिकारी सदर अपघाताची सूचना दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघात ग्रस्त कार ही बल्लारपूर येथील रजत परमार यांची असून त्यांच्या सोबत दोघे अपघाताच्या वेळेस कारमध्ये होते.
हा अपघात एवढा जोरदार होता की कार ने धडक दिलेल्या झाडाची फांदी कार च्या पुढील भागवर तूटून पड़ली त्यामुळे कार चा पुढील भाग चपकुन गेला तसेच अपघात स्थळा पासून काही अंतरावर डिक्स चे टुकड़े आढळून आले या वरुन असे लक्षात येथे की सदर कार ही किती अनियंत्रित वेगात होती.

सदर अपघाताने पुन्हा एकदा  मद्यधुंद पर्यटकामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे यावर सुद्धा ताडोबा प्रशासनाने विचार  करने गरजेचे आहे

याबाबत वन्यजीव प्रेमी मध्ये चर्चा सुरु आहे की सदर कार ने एखाद्या वन्यजीवाला धडक देऊन जखमी तर केले नाही ना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here