हवामान बदलाचे धोके  प्रा सुरेश चोपणे, चंद्रपूर

0
343

          २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा केला जातो,ह्यानिमित्ताने हवामान बदलाच्या धोक्यासमंधी आजच आपण सावध झालो नाही तर जगाचे प्रचंड नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.हा बदल काही अचानक झाला नसून गेल्या ५० वर्षापासून मानवाने निसर्गाची केलेली हानी ह्याला कारणीभूत आहे .पुढे २० व्या शतकात लोकसंख्या वाढ,विजेसाठी कोळश्याचा वापर ,अनेक रासायनांचा वापर सुरु झाला. दुसरीकडे शेतीसाठी, उद्योग आणि विकासाच्या कामासाठी पर्यावरणाचा समतोल राखणारी वने मोठ्या प्रमाणावर तोडल्या गेली.ह्यामुळे जमिनीचे तापमान वाढले,हरित गृहाचा परिणाम झाला,ओझोनला छीद्र पडले,पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले,ध्रुवावरील बर्फ,ग्लेशीअर्स वितळू लागले,ह्या सर्वांचा परिणाम देशातील जलस्त्रोतावर ,शेतीवर ,पर्यावरनावर आणि हवामानाआवर झाला. अत्याधिक हवामान बदल आणि  नैसर्गिक आपत्ती मुळे शेतीला मोठा फटका बसत आहे,उद्योगांना सुद्धा आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. आज ह्यामुळे आपली अर्थव्यवस्था ढासळली.पुढेही संकटे वाढणार आहेत म्हणून आजच युद्ध पातळीवर हवामान बदल थांबविला पाहीजे.गेले दशक हे अत्याधिक हवामान बदलाचे झाले असून युरोप मध्ये पूर,ऑस्ट्रेलिया ,अमाझोन मध्ये आगी ,थंडीच्या उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत.२०२० हे वर्ष महामारी सोबतच गेल्या १०० वर्षातील तीव्र हवामान बदलाचे वर्ष ठरले.जगभर उष्ण लहरी,जंगलांना आगी,लांम्बलेला मोन्सून,नोवेम्बरच्या सुरवातीची थंड लहर आणि दर आठवड्यात बदलणारे हवामान असे कधी पाहिले गेले
-हवामान बदल हा शब्द आज सर्व वैज्ञानिक,राजकीय नेते आणि  जनमान्याच्या तोंडी पडलेला परवलीचा शब्द झाला आहे,जगात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली,पाउस उन्ह किंवा इतर हवामानात बदल दिसला की क्लायमेट चेंज हा शब्द सर्वांच्या तोंडी सहज येतो.परंतु २५ वर्षापूर्वी मात्र अनेक बुद्धिवादी लोकसुद्धा ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. जागतिक हवामान विभाग आंणी भारतीय हवामान विभागांचा १०० वर्षाचा हवामानाचां इतिहास पाहता (१८८६-१९८६) काही अपवाद वर्षे वगळता हवामान स्थिर राहिले होते.हवामान खात्याने ३० वर्षाचा काळ हा हवामान बदलाचा काळ ठरविला  आहे.,त्यानुसार १९०१ ते १९३० हा कोरडा काळ १९३१ ते १९६० हा ओला काळ.१९६१ ते १९९० हा पुन्हा कोरडा काळ तर १९९१ ते २०२० हा ओला काळ ठरविला आहे. ह्यात भारताने १९ कोरडे तर १३ ओले दुश्काळ पाहिले आहेत.परंतु ह्या सर्व काळात अत्याधिक हवामान बदलाच्या घटना क्वचितच घडल्या.परंतु १९८६ नंतर हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे आणि तापमान वाढीमुळे हवामान बदलाला सुरवात झाल्याचे आकडेवारी आकडे वारीवरून कळते .अत्याधिक हवामान बदल खऱ्या अर्थाने २०१० ते २०२० ह्या दशकात मोठ्या प्रमाणावरवाढल्याचे दिसते. भारतासहित जगातही सर्वाधिक तापमानवाढीचे आणि नैसर्गिक आपातीचे हेच दशक ठरले. दर नवीन वर्षे हे मागच्या वर्षाचे उच्चांक मोडीत गेले.ह्याच काळात थंडीच्या आणि उष्णतेच्या लहरींनी उच्चांक गाठला.वादळे ,महापूर,भूस्कलन अश्या घटना घडल्या.आय.पी.सी.सी. आणि यु.एन.ई.पी ह्या संस्था नुसार १९५० पासून पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत गेले.दर दशकात ते ०.०५ ने वाढले आणि आज ते १.० डी से च्या पुढे गेले मागील १००० वर्षात प्रथमताच २०००,२००५,२०१० ,२०१३ आणि पुढील प्रत्येक वर्षे अत्याधिक तापमानाचे वर्षे ठरली. २०१९ – २०२० हे वर्ष हे गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक हवामान बदलाचे आणि नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले. अगदी ह्या उलट हीच वर्षे सर्वाधिक थंड वर्षे सुद्धा ठरली असा अभ्यास नासाच्या गोडार्ट इंस्टीट्युट ऑफ स्पेस स्टडीस ने केला आहे.त्यांच्या मते १९५० च्या दशकात सरासरी तापमान ५७ डी फेरनहिट होते ते दर दशकाने वाढत जाऊन २०१३ पर्यंत ५८.३ डी फे झाले.इंडियन कोन्सील ऑफ अग्रीकॅल्चर रिसर्च ह्या संस्थेने भारतीय हवामान विभागाची आकडेवारी अभ्यासून तापमान वाढले असल्यामुळे थंडी,उष्णता,कमी अधिक पावसाचे प्रमाण वाढल्याचे आणि जीडीपी १५ टक्क्याने कमी झाल्याचे म्हटले आहे तसेच बदलत्या हवामानानुसार
हवामान बदलाचे भारताच्या विविध घटकावर परिणाम 
               हिमालयाचा जगातील सर्वात उंच आनि विस्तृत बर्फाळ प्रदेश म्हणून आपल्याला अभिमान असला तरी अलीकडे जागतिक तापमानवाढीमुळे भारतावरील संकट वाढू लागले आहे.ह्याचे कारणसुद्धा तितकेच महत्वाचे आहे.हिमालयातून सिंधू,गंगा आणि ब्रम्हपुत्रा नद्या,उपनदयाचे  खोरे तयार झाले आहे.सिंधू नदीच्या खोऱ्यात सर्वात मोठ्या संख्येत म्हणजे ३५०० हिमनग आहेत आणि गंगा,ब्रम्हपुत्रा नद्याच्या उगमात १६०० हिमनग आहेत.परंतु हवामान बदलामुळे ह्या नद्या कधी महापुर तर कधी पाण्याचा दुष्काळ आणतात. हिमालयाच्या नद्यावर संपूर्ण उत्तर भारत अवलम्बून आहे,हिमालयामुळेच मौसमी प्रणाली आणि देशाचे हवामान अवलंबून आहे
भारताला ७५१७  किलोमीटर चा समुद्रकिनारा लाभला आहे,त्यात ९ राज्ये,२ केंद्रशासित प्रदेश आणि २ बेटे आहेत.ह्यातील ७० किनारी जिल्ह्यात  १७१दशलक्ष लोक राहतात.आणि १४.५ दशलक्ष लोक हे मासेमारीवर अवलंबून राहतात समुद्र किनारे ही एक फार मोठी नैसर्गिक देणगी आणि साधनसंपत्ती आहे,परंतु हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका बसला आहे
हवामान बदलाचा मोठा फटका भ्रारातातील नद्या,नाले,आणि इतर जलस्त्रोतावर झाला आहे.गेल्या २०१० पासून भारतांत उष्णलहरींचा प्रकोप वाढल्याचे लक्षात येते.पृथ्वीवरील १० सर्वाधिक तापमानाच्या प्रदेशात भारतातील काही शहरे येतात.ह्या वाढत्या तापामानामुळे भूजल,तलाव,नद्या नाले आणि इतर सर्व जलस्त्रोतांच्या पाण्याची वाफ होऊन ती कोरडी पडत आहे.भारताचा मराठवाडा,गुजरात,राजस्तान वगळता देशात सर्वत्र ११७० मिमी पावसाची सरासरी आहे म्हणजे दरमाणसी ६१,००० क्युबिक फुट इतके पाणी वाट्याला येते.परंतु ह्यातील बहुतेक पाणी समुद्रात वाहून जाते..
          परिसंस्थां ही अतिशय संवेदनशील असते.जैविक आणि अजैविक घटकांपासून आणि शेकडो वर्षाच्या संतुलित हवामानातून टी तयार झालेली असते.ह्या परिसंस्थेवर र्वृक्ष,प्राणी आणि सर्व जीव अवन्बून असतात नव्हे तर ह्यात परीसंस्थामधून साजीवाचा विकासक्रम झालेला असतो ,परंतु वृक्षतोड,प्रदूषण, तापमानवाढ,आणि हवामान बदल ह्यामुळे अश्या संवेदनशील परीसंस्थावर विपरीत परिणाम होऊन काही प्रजाती नष्ट झाल्या तर काही धोकादायक श्रेणीत आल्या आहेत.
         गेल्या ११६ वर्षाच्या इतिहासात २०१६ वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे .१९६१-१९९० ह्या वर्षाच्या तुलनेत २०१६ चे तापमान वार्षिक सरासरीने ०.९१ ते +1.३६ डिग्री सेल्सिअस वाढले होते. क्रमवारीने २०१५ , २०१४ , २०१० ,२००९, २००२ ही वर्षे अत्यंत उष्ण वर्ष ठरले. परंतु अलीकडे ‘ अल नीना’ चे आगमन ,शहरी सिमेंटीकरण हिट आयलंड इफ्फेक्ट ,उद्योग आणि वाढते प्रदूषण  ह्यामुळे तयार झालेला ‘हिट आयलंड इफ्फेक्ट’ ह्यामुळे येणारे २०२१ चे मार्च ते मे महिने शहरांसाठी सर्वाधिक उष्ण ठरणार आहे .
नैसर्गिक आपत्तीत वाढ– जागतिक तापमान वाढीमुळे अत्याधिक हवामान बदलाच्या घटनांत वाढ होत आहेत. गेल्या दशकात ह्या घटना वाढल्या हे देश –विदेशातील बातम्या वाचल्या नंतर सहज लक्षात येईल.हिमालयात होत असलेली ढगफुटी,भूस्कलन,अवलांच, बर्फ वितळणे,अतिवृष्टी,मुंबई,केरळ येथील अतिवृष्टी,उष्ण लहरी ,थंडीची लाट,वादळे,विजांचा प्रकोप,मध्य भारतातील उष्ण लहरी,गारांचा पाउस,धुळीची वादळे,वणवा ह्यात सातत्याने वाढ होत आहे.भारतातील १४८ दशलक्ष नागरिक हे अत्याधिक प्रदूषण ,तापमान आणि हवामान बदलाच्या हॉट स्पॉट क्षेत्रात राहतात.त्याचसोबत ४४१ दशलक्ष लोक साधारण हॉट-स्पॉट क्षेत्रात राहतात.महाराष्ट्रातील विदर्भाचा ह्या होत-स्पॉट मध्ये समावेश होतो.
       हवामान बदलाचा सर्वाधिक तडाखा मानवाच्या आरोग्यावर झाला आहे. रोगराई प्रचंड वाढल्याचे जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीवरून कळते.तापमान वाढीमुळे त्या त्या क्षेत्रातील हवामानात सूक्ष्म बदल झाले असून त्यामुळे रोगाणु आणि विषाणू वाढू लागले आहेत.सध्या जगात दरवर्षी नवनवीन विषाणू स्वातात बदल करून मानवावर आक्रमण करीत आहेत.कोरोना विषाणू हा त्याचाच एक परिपाक असल्याचे संशोधनाने सिद्ध झाले आहे.जगातील ८ लोकांच्या मृत्यूमागे १ व्यक्ती प्रदूषणामुळे होणार्या अआजाराने मरतो,एकट्या २०१२ वर्षात ७ दशलक्ष लोक प्रदूषणाने मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे.आणि दरवर्षी हा आकडा वाढत आहे वने-वण्यजीवावर परिणाम-हवामान बदलाचा परिणाम भारतातील वनावर होत असल्याची अनेक उदाहरणे आज दिसू लागली आहेत.
आपल्याच दुष्कर्मामुळे निसर्ग आपला सखासोबती आता राहिला नसून तो आता आपले विकाराल रूप धारण करीत असून आपला नाश करू पहात आहे.आजच सावध होऊन आपण निसर्ग संरक्षणाचे उपाय केले नाही तर सामुहिक विलुप्ती निश्चीत आहे.
 

                                     
प्रा. सुरेश  चोपणे                                                                                             
अध्यक्ष   ग्रीन प्लानेट सोसायटी

सदस्य– आर ई सी (केंद्रीय वने.पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय ),दिल्ली चंद्रपूर,महाराष्ट्र फोन-९८२२३६४४७३,इमेल –smchopane@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here