ब्रह्मपुरी वनविभागात आणखी एक वाघाचा मृत्यू :  तीन दिवसात दोन वाघांचा मृत्यू

0
243

(वर्ष भरात  चंद्रपूर जिल्ह्यात 21 वाघांचा  मृत्यू)

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):

ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र येथील  गोविंदपुर नियतक्षेत्र येथील जंगलालगतच्या मुमताज अहेमद शेख यांचा शेतातील गट क्रमांक 165/1 मध्ये सकाळच्या सुमारास वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना एक वाघ शेतात मृत अवस्थेत आढळून आला.
सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन मौका पंचनामा केले असता निरदर्शनास आले की  मृत वाघ हा नर असून त्याचे अंदाजे वय एक ते दीड वर्ष आहे.


सदर घटनेत वाघाचा बछडा आपल्या एखाद्या शिकारीची पाठलाग करीत असताना जमीन लेवलला असलेल्या व कठळा नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाले असल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेत विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याने  स्वताला वाचविण्यास प्रयत्न केले असल्याचे पुरावे विहिरीच्या भिंती वरील त्याचे नखाने ओरबडल्याचे निशान मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. यावेळेस घटनास्थळी  परिसरात कार्यरत स्वाब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर, बंडू धोतरे NTCA प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन यांच्या उपस्थितीत मौका पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता तळोधी वन विभागाच्या सावरगाव येथील लकडा डेपो मध्ये नेण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले.


यावेळेस डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ. ममता वानखेडे पशुधन विकास अधिकारी नागभीड यांनी शवविच्छेदन केले व शवविच्छेदनानंतर वाघाच्या बछड्याला  लकडा डेपो, सावरगाव येथे अग्नी देण्यात आले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक  एस. बी. हजारे, तळोदी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, गोविंदपुर चे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड नेरी चे क्षेत्र  सहाय्यक रासेकर तथा, तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी व स्वाब संस्थेचे संपूर्ण सदस्य हे उपस्थित होते.
मागील तीन दिवसांमध्ये दोन तर महिन्यात तीन वाघ ब्रह्मपुरी वन विभागाअंतर्गत केल्याच्या घटना घडल्या त्यात परिक्षेत्र अंतर्गत 27 नोव्हेंबर 2023 ला रेल्वेच्या धडके मध्ये वाघाच्या बछड्याचे मृत्यू झाले होते, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल येथील एका खाजगी शेत शिवारात गट क्रमांक 164 मध्ये शिकारी करिता लावलेल्या विद्युत प्रवाहात एक वाघ 21 डिसेंबर  व आज दि. 24 डिसेंबर 2023 ला तळोधी  वनपरिक्षेत्रामध्ये कठळा नसलेल्या विहिरीत पडून आनखी एक वाघाच्या बछड्याचा  मृत्यू झाले असल्याची  घटना निदर्शनास आली. त्यामुळे मागील तीन दिवसात दोन वाघ , तर महिन्यात तीन वाघाचा मृत्यूची घटना सामोर आली.
जिल्ह्यात वर्षभरात एकूण 21 वाघाचा मृत्यूची खळबळ उडाली आहे. यात काही घटना आपसी संघर्षातून, काही शिकारी मध्ये, तर काही अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वनविभागासाठी चिंतेचा विषय झालेला आहे.
जिल्ह्यात वर्षभरात एकूण २१ वाघांचा मृत्यू झाला आहे.  यातील काही घटना परस्पर मारामारीमुळे, काही शिकारीमुळे, तर काही अपघातामुळे घडल्या असल्याने हा वनविभागासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here