सावली वनपरिक्षेत्रात वाघाचे संशयास्पद मृत्यू

0
479

(तिसऱ्या वाघाचा सलग चौथ्या दिवशी मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात एका वर्षात एकूण 22 वाघांचा मृत्यू, डिसेंबर 2023 वाघांसाठी दुःखद ठरणार आहे)

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):

वनविभाग चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या सावली वनपरिक्षेत्रातील, व्याहाड उपक्षेत्र मधील सामदा बीट, येथे गोसेखुर्द कालव्याच्या बाजूला एका शेतात वाघ मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ.
सदर घटनास्थळी वन विभागाने पाहणी केली असता मृतक वाघ हा नर बछडा असून अंदाजे ६ ते ७ महिने वयाचा आहे. सदर मृत वाघ हा दोन ते तीन दिवसापूर्वी मृत झाले असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवली जात आहे व त्या वाघाच्या तोंडाला जखम असल्याचे दिसून आले आहे.
त्यानुसार परिसरातील  रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या महामार्गावरील ट्रक किंवा वाळू तस्करीच्या वाहनाने धडक  दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यावेळी NTCA चे प्रतिनिधी बंडू धोतरे यांच्या उपस्थितीत मौका पंचनामा व शवविच्छेदन करून वाघाला अग्नि दहन करण्यात आले.
याप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल करण्यात आला असून DFO खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावली वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर तपास करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमीं मध्ये दुःखाची लाट पसरली आहे व वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here