कुणघाडा वनपरिक्षेत्रात वाघाचा हल्ल्यात महिला जखमी

0
321

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गिलगाव येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दि. २७ सप्टेंबर  २०२२ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सदर घटनेत जखमी महिलेचे नाव सुमनबाई कानोजी भोयर  वय (६०) वर्ष राहणार मु.पोस्ट गीलगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे आहे.

प्राप्त माहितीनुसार शेतात गवत कापत असतांना अचानक  वाघाने महिलांवर हल्ला केला व ती यात  गंभीर जखमी झाल्या आहे. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना  मिळताच लगेच त्यांनी गीलगावचे क्षेत्रसहाय्यक  मडावी यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना कळविले असता लगेच घटनास्थळ गाठून जखमी महिलेला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून जखमी महिलेचा उपचार सुरु आहे.
सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे व वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here