केवाळा येथिल घटना संशयास्पद, आरोपी वाघ की माणूस ? वनविभाग संभ्रमात 

0
805

संशयास्पद मृत्यू असूनही मृतदेह का जाळण्यात आले ?

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी च्या तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत, नेरी नियत क्षेत्रातील, गोंधोळा बिटातील कक्ष क्रमांक 34 मध्ये , 24 मे ला सकाळी तेंदुपत्ता संकलना करिता गेलेल्या जांभुळकर दाम्पत्य पैकी मीना जांभुळकर चे मृतदेह सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास जंगलात मिळाले व पती विकास जांभुळकर हे लापता होते.
जंगलात मृतदेह मिळाल्याने हे वाघाच्या हमल्यात मृत्यूची शक्यता वर्तवून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व तात्काळ मदत म्हणून मृतकाच्या परिवाराला 25,000 रु (पंचवीस हजार) रुपये देण्यात आले व लापता असलेल्या विकास जांभुळकरची शोध मोहीम दिवसभर राबविण्यात आली मात्र विकासचा शोध लागला नाही. तसेच घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले
वन विभागाने घटनास्थळाची सखोल पाहणी केली असता वाघ, बिबट किंवा अस्वल यासारख्या कोणत्याही वन्यप्राण्याचे पद चिन्ह घटना स्थळी किंवा जवळपास आढळून आले नाही. मृतकाच्या डोक्यावरील जखमाची वाघाच्या हमल्यात होणारी जखम जुळवूण येत नसल्याचे वनविभागाला दिसून आले. मृतकाच्या शरीरावर इतरत्र कुठल्याही जखमा सुद्धा नाही. मृतदेह घटनास्थळी पाऊल वाटेवरच पडून होता, मात्र वाघ हमला केल्यानंतर आपल्या शिकारीला खिचत झुडपात घेऊन जातो. तेव्हा शरीरावर किंवा घटनास्थळी खिचतान केल्याच्या किंवा झटापट झालेल्या कुठल्याही खुणा आढळून आल्या नाही. तसेच घटनास्थळा पासून जवळच रक्ताने माखलेला एक दगड पडलेला होता. त्या दगडावर रक्त कोणाचा व तो रक्ताने माखलेला दगड तिथे कुठून आला? अशा प्रकारे घटनास्थळी संभ्रमात टाकणारे असे दृश्य व वाघाच्या हमल्याचे कोणते ही पुरावे न मिळाल्याने, व कॅमेरा ट्रॅप मध्ये सुद्धा घटनास्थळी,  वाघ व इतर कोणताही प्राणी कॅमेऱ्यात न आल्याने वन विभाग संभ्रमात पडला.
दुसऱ्या दिवशी दि. 25 मे 2022 रोजी पुन्हा सकाळी वन विभागाने ड्रोनच्या साह्याने शोध मोहीम राबविण्यात आली तेव्हा घटना स्थळा पासून घटनेच्या दिवशी शोध घेतलेल्या जागेवरच, घटने पासून जवळपास 300 मीटर अंतरावर विकास जाभुळकर जख्मी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर  त्याला नागपूर येथे रुग्णालयात  उपचारासाठी  पाठविण्यात आले. त्याच्या डोक्यावर झालेली जखम ती कुठल्यातरी अवजाराने केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते,  वाघाने पंजा मारला असता तर डोक्याला एक ऐवजी  तीन किंवा चार नखे ओरबाडून आले असते.
मात्र यातही डोक्यावर गंभीर दुखापत असूनही 20 तास बिना पाण्यावाचून व हातात कुर्हाड असून व चालत असूनही गावात न येता विकास जंगलातच का लपून राहिला ? हा प्रश्न  विभागात निर्माण झाला.
वाघाच्या हल्ल्यातील मृतकांच्या घटना व या घटनेत कोणतेही साम्य दिसून येत  नसल्याने शंकाच्या आधारावर पुन्हा शवविच्छेदनासाठी शव चंद्रपूरला पाठवला होता
मात्र परत आणण्यात आला. डॉक्टरांनी आपल्या अहवालात ‘वाघाचाच’ हमला असल्याचे नमूद केले आहे.
इतर कोणताही वन्य प्राणी नाही तो ‘वाघच’ आहे असे कसे माहित?   व  ही घटना संशयास्पद असूनही शव दफन न करता जाळण्यात आले.
या घटनेसंदर्भात संपूर्ण  सखोल चौकशी व्हावी जेणेकरून त्या कुटुंबावर  काही अन्याय होऊ नये व वन्यजीवांच्या हमल्या बाबतीत ही कोणत्याही प्रकारे डोळेझाक पणे निर्णय घेण्यात येऊ नये.

“घटना स्थळ, मृतकाचे शरीरावरील व जख्मीच्या डोक्यावरील जखम पाहता, व कॅमेरा ट्रॅप मध्ये कुठल्याही शिकारी प्राण्याची घटनास्थळी हालचाल न दिसल्याने. आज पर्यंतच्या इतरत्र झालेल्या वाघाच्या हल्ल्यातील मृतकांच्या घटना व या घटनेत कोणतेही साम्य दिसून येत नसल्याने शंका ₹च्या आधारावर पुन्हा शवविच्छेदनासाठी शव चंद्रपूरला पाठवला होता मात्र परत आणण्यात आला  व  सदर घटना संशयास्पद असून ही शव जाळण्यात आले. यात चिमूर पोलिसांची भूमिका ही संदिग्ध वाटत आहे.
या घटने संदर्भातील कारणांची पोलिस विभागाच्या सहकार्याने सखोल चौकशी व्हावी.”
के.आर.धोंडणे, सहा. उपवन संरक्षक, ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी.
हैदराबाद येथे काही नमुने D.N.A. तपासासाठी पाठवले आहे, तिथून अहवाल येईपर्यंत आणि काही शंकांचे निरसन होईपर्यंत आम्ही काहीही बोलू शकत नाही.
आजपर्यंत वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना वन विभागा कडून नुकसान भरपाई मिळाली होती, या संशयास्पद घटनेमुळे त्याला विलंब होत आहे.
– दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here