
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मोहुर्ली गावात “मोहर्लीचा वन राजा गणेश मंडळ”च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेतून गणेश उत्सव साजरा करण्यात आला. यंदा उत्सवात विविध सांस्कृतिक, शारीरिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले “टाकलेल पोर” या सामाजिक विषयावर आधारित नाटकाचे सादरीकरण. या नाटकातून समाजात घडणाऱ्या वास्तव घटनांना प्रकाशझोत देण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्राथमिक उद्घाटन भाजपा नेते मा. श्री. रमेशजी राजूरकर (राज्य परिषदेचे सदस्य व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख) यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर झालेल्या विविध स्पर्धांतील कब्बडी व वॉलीबॉल स्पर्धाचे विजेत्यांना बक्षिसांचे वितरण देखील मा. रमेशजी राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास मोहुर्ली वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे, मोहर्ली ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीता ताई कातकर,पोलीस पाटील मोहर्ली रामकृष्ण साखरकर, भाजपा तालुका अध्यक्ष (ग्रामीण) देवानंद जांभुळे, माजी शहर अध्यक्ष वरोरा भाजपा सुरेश महाजन, माजी नगराध्यक्ष वरोरा विनोद लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. भावनाताई मगरे, वन राजा गणेश मंडळ अध्यक्ष सुलेमानजी बेग, ग्रामपरिस्थितिकी विकास समिती अध्यक्ष संजय मोंढे, विकास गेडाम, शामल नन्नावरे, शारुख शेख, अरविंद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय मोहुर्ली, भामडेली, सीतारामपेठ, मुधोली व परिसरातील गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाला भरघोस प्रतिसाद दिला.
वन विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकाराने साजरा होणारा हा गणेशोत्सव सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन व सांस्कृतिक जाणीव वाढवणारा ठरत आहे.


