
वनपरिक्षेत्र प्रादेशिक येवला व नांदगाव वनकर्मचारी यांनी दिनांक 31 जुलाई 2021 रोजी मनमाड-मालेगाव रस्त्यावरील एवं पेट शॉप अंड एक्वेरियम नावाच्या दुकानाचा संशयाच्या आधारे झडती घेण्यात आली असता सदर दुकानात लपवून ठेवलेल्या दोन पिंजऱ्यात 7 पोपट व काचेच्या भांड्यात पाण्यात ठेवले लहान मोठे 17 कासव हे वन्यप्राणी मिळाले.
सदर घटनेची माहिती वन विभागाच्या हॅलो फॉरेस्ट च्या टोल फ्री क्रमांक 1926 वर एका वन्यजीव प्रेमी ने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही माहिती प्राप्त झाली.
दुकान मालक सलीम सत्तार शेख राहनार मनमाड यास सर्व मुद्देमालासह पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. आरोपीने अवैधरित्या वन्यप्राणी संरक्षण अधिनियम 1972 मध्ये संरक्षण मिळालेले शेडयूल 1 मधील कासव (वन्यजीव) व शेडयूल 4 मधील पोपट हा पक्षी अवैधरित्या विक्री करण्यासाठी पकडून ठेवलेले असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2,9,39,40,44,48 (b), 50 (5), 51,52 व 57 तरतूदीचा भंग होऊन वन गुन्हा घडल्या असल्याने आरोपी सलीम शेख यास मनमाड न्यायालयात हाजर करण्यात आले व पुढील चौकशीसाठी 2 दिवसाची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली. भविष्यात वन्यप्राणी व पक्षी खरेदी केलेले ग्राहक कायद्याच्या लपेट्यात येऊ शकतात. सदर घटनेची कारवाई तुषार चव्हाण उपवनसंरक्षक पूर्व भाग नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली सुजित नेवसे सह वनसंरक्षक, मनमाड़, बशीर शेख वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला, तानाजी भुजबळ वनपरिक्षेत्र अधिकारी,नांदगाव, वनपाल भगवान जाधव, मोहन पवार,राठोड , वनरक्षक राजेंद्र दौड, नाना राठोड, प्रसाद पाटील, नवनाथ बिन्नर, पंकज नागपुरे, गोपाळ हरगावकर, ज्ञानेश्वर वाघ, प्रफुल पाटील, मागेपाड यांनी पार पाडले.
