
चंद्रपूर : पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने दि. 08 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकाल्प तर्फे आष्टा येथील गाव तलाव परिसरात पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात किसान विद्यालय, आष्टा येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षक उत्साहाने सहभाग नोंदविला.

या वेळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) चे क्षेत्र सहाय्यक व्ही. डी. कामटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व सांगितले. तसेच ताडोबाचे सुप्रसिद्ध पक्षीनिरीक्षक म्हणून ओळखले जाणारे सुमेध वाघमारे (बर्ड मेन ऑफ ताडोबा) यांनी विद्यार्थ्यांना पक्षी ओळख आणि निरीक्षणाचे कौशल्य शिकवले.

पक्षी निरीक्षण करण्यात (विंग्ज ऑफ ताडोबा) चे अजय पोद्दार, मोहम्मद सुलेमान बेग, आणि विपुल धवळे यांनी पक्षी निरीक्षण करण्यास व त्यांची माहिती देण्यास मदत केली.
निरीक्षणादरम्यान एकूण 47 पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. या उपक्रमात एम. राजगडे (वनरक्षक, सोनेगाव), एन. डी. जुळे (वनरक्षक), आर. बी. वगारे, किसान विद्यालय चे मडावी, पेंदोर आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक पक्षी जीवनाचे संवर्धन करणे हे होते.




